पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा सहसचिवांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०७-२०२५
पनवेल:- दिनांक ०८/०७/२५ रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा सहसचिव तसेच शिवधर्म व झुंजार टाईम्स वृत्तपत्राचे उपसंपादक महेंद्र माघाडे यांचा वाढदिवस पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात साजरा करण्यात आला.
पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांचीही उपस्थिती होती.
पनवेलच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या या कार्यक्रमाला रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हा संघटक उमाजी मंडले, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत, उरण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण नाईक, उरण तालुका संघटक अलंकार कडू तसेच अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रितम चौहाण, समीतीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर, आणि खास अंबरनाथ वरून आलेले पाहुणे पत्रकार निलेश जाधव, पत्रकार विनोद देशमुख तसेच समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आशा ढसाळ, प्रिया उपासनी आदींनी महेंद्र माघाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव केला.