माहिती तंत्रज्ञान

आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपुर मंदिरा बाहेर आखिल भारतिय अनिस चा प्रबोधनात्मक स्टाॅल. .

दैनिक झुंजार टाईम्स

महेंद्र माघाडे:- वार्ताहर मुंबई

दिनांक ०७-०७-२०२५

रविवार ६ जुलै. आषाढी एकादशीनिमित्त वडाळा येथील प्रतिपंढरपुर मंदिरात भाविकांची विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात सकाळपासुनच,रिघ लागली होती.

मंदिराबाहेर गेली तीस वर्षांपेक्षा आधिक काळ संताचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आखिल भारतिय अंधश्रद्धा निर्मूलन समितिचा,प्रबोधनात्मक सप्रयोग, चमत्काराचा स्टाॅल वडाळा येथे लावला जातो. ह्या स्टाॅल मध्ये विठ्ठल भक्तांसाठी चमत्कार प्रात्यक्षिकासह, जादुटोना विरोधी कायदा,जनजागृती प्रबोधन दिंडीची माहिती पत्रांचे वाटप स्टाॅलवर करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत केला .

या कायद्याचा सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा .सोबतच त्यांच्या मनात भूत,भानामती, जादूटोणा,करणी, काळी जादू इत्यादी अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा कमी व्हाव्यात हाच या प्रबोधनाचा प्रमुख हेतू असतो.

जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी समिती गेली ४३ वर्ष कार्यरत आहे. या स्टॉलवर विविध चमत्कारा मागील विज्ञान सर्वसामान्य जनतेला समजावून सांगितले जाते. हा स्टॉल सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत वडाळा येथे खुला ठेवला जातो. या स्टॉलवर प्रा. श्याम मानव सरांची पुस्तके उपलब्ध असतात.

या कार्यक्रमात, उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर, अजित पाध्ये, ज्ञानेश मावळे, सचिन हिंदळेकर, प्रकाश यादव, सुजित सरोज, निता डूबे, कल्पना गोसावी, कैलास मोहिते, वामन खर्डे, डॉ.प्रकाश सावंत, यशवंत सपकाळे, चंद्रकांत सर्वगोड, किरण जाधव, दिपक मोरे, नरेंद्र जाधव, बावस्कर, हासोळकर, पावसकर,तसेच इतर नवे जुने कार्यकर्ते वडाळा डाॅ.आंबेडकर कॉलेजचे NSS चे विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button