तुझ्या दर्शनाची आस, कधी थांबायची नाही ,उभ्या जन्मात विठ्ठला ,वारी चुकायची नाही. विठ्ठल भक्तांनी अंतर्मनाने मारली हाक!

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०६-०७-२०२५
हिंदू धर्मात प्रत्येक क्षण पवित्र मानला जातो. ज्यामध्ये संकष्टी एकादशी व मासिक एकादशी समावेश असतो. हिंदू पंचांगानुसार महिन्याला दोन वेळा एकादशी येते. एक कृष्ण पक्षात येते तर दुसरी शुक्ल पक्षात येते. अशाप्रकारे २४ एकादशी वर्षात येत असतात परंतु २४ दशकातील एक अत्यंत खास एकादश मानली जाते. त्याची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात. आषाढी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानले जाते. याच एकादशीला देवशयांनी मानले जाते. या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापा पासून मुक्ती मूर्ती असे मानले जाते.
यावर्षी हिंदू पंचांगानुसार रविवार दिनांक ०६-०७-२०२५ या दिवशी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूर आषाढी एकादशीला चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतात. याच दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते.
सुमारे २८ युगापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीत वनात शोधण्यासाठी आले. त्याचवेळी भगवंत पुंडलिकांना भेटायला आले असता पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होते त्यामुळे भगवंताला बसण्यासाठी पाठ न देता वीट दिली होती त्याच विटेवर भगवंत उभे राहिले. आई-वडिलांची सेवा करून पुंडलिक भगवंत विटेवर उभे राहिले. भगवंताने राग न मानता आई-वडिलांची सेवा करणारा आदर्श पुढील पिढीसमोर सदैव राहावा, माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त ‘तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील.’ त्यामुळे भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला.
कित्येक वर्षापासून शेकडो भाविक पंढरपूरला आषाढी एकादशीला जातात. यामध्ये महिला पुरुष लहान मुले इत्यादींचा पारंपरिक वेशभूषा परिधान करून पालखीमध्ये सहभागी होतात. पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत विठ्ठल भक्त आपली वारी विठ्ठल नामाचा जयघोष करीत पूर्ण करतो.
शेकडो दशकापासून ज्यांनी पंढरीची वारी पायी प्रत्येक वर्षी पूर्ण केलेली आहे. त्यांना विठ्ठलाच्या भक्तीने दरवर्षी विठ्ठल भक्त वारी “तुझ्या दर्शनाची आस, कधी थांबायची नाही ,उभ्या जन्मात विठ्ठला ,वारी चुकायची नाही” यानुसार अखंडपणे करतो. कोणताही जात धर्म भेदभाव न बाळगता एकमेकांना वारीत सांभाळून घेतात.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळे वारकरी संप्रदाय यांचा फार मुलाचा वाटा आहे. त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात संस्कृती जपली जाते. पण अखंडपणे पंढरीची वारी करणाऱ्या विठ्ठल भक्तांना कोणत्या ना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विठ्ठल भक्त आपले अदृश्य दर्शन देऊन मनोकामना पूर्ण करतो हे नक्कीच!