अपरिचित इतिहास
नवीन अभ्यासक्रमातून हिंदी भाषा वगळली.

दैनिक झुंजार टाईम्स
उमाजी मंडले:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०६-०७-२०२५
राज्यात काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती वरून बराच गदारोळ झाला म्हणून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आगामी शैक्षणिक वर्षाकरिता नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या नवीन वेळापत्रकात हिंदी भाषेचा समावेश करण्यात आलेला नाही. याआधी प्रथम इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ज्यामध्ये हिंदीचा तिसऱ्या भाषा म्हणून समावेश करण्यात येणार होता. मात्र, भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.