भक्ती श्रध्दा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा.

दैनिक झुंजार टाईम्स 

राजपाल शेगोकार:- पंढरपूर प्रतिनिधी 

दिनांक:- ०६-०७-२०२५

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शासकीय महापुजेचा मान मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता व मुलगी दिविजासह विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांनी राज्यातील शेतकरी, कष्टकरी व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. नाशिकच्या मानाच्या वारकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. दरम्यान, मुंबईतील वडाळा विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेही पूजा पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button