जल जीवन मशीन योजनेअंतर्गत बांधलेल्या जलजीवनवाहिनी ३० करोड रुपयांचा खर्च पाण्यात.

झुजार टाईम्स
अमोल पाटील:- रत्नागिरी (खेड) प्रतिनिधी
दिनांक:- ०५-०७-२०२५
खवटी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी २०२२ मध्ये ‘हर घर जल ‘या योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधण्याचे काम कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आली. पण विहिरीच्या काही अंतरावर नदी वाहत आहे.
विहिरीचे पूर्ण काम सिमेंट काँक्रेट मध्ये झाले आहे. विहिरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एवढे खोट्यावधी रुपये खर्च करून विहिरीमध्ये नदीचे दूषित पाणी विहिरीत आले. त्यामुळे लोकांना पिण्याचे पाण्याची मोठी गैरसोय झाली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विहिरीत पाणी आल्याने सर्व पाणी दूषित झाले आहे. गावातील सर्व नागरिकांची पिण्याच्या अवस्था बिकट आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केली असता ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते.
गावातील लहान मुले स्त्रिया पुरुष अशा सर्व वर्गातील नागरिक काही प्रमाणात पाण्यामुळे आजारी पडले आहेत. या पाण्यामुळे वेगवेगळे नागरिकांना आजारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने व ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाण्याचीही गंभीर समस्या सोडवण्यासाठी नागरिक हतबल झाले आहेत पण ग्रामपंचायत याकडे लक्ष द्यायला तयार नाही. या जल जीवन वाहिनी मध्ये भ्रष्टाचार झाला तर नाही ना? कंत्रादाराने काम निकृष्ट दर्जाचे केले आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये बोलताना दिसत आहेत.अशावेळी दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना कोण सोडणार ?याच चिंतेची बाब खवटीच्या नागरिकांमध्ये आहे.