येळगाव जिल्हा परिषद मतदार संघात माननीय डॉ.आमदार अतुल बाबा भोसले यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप.

झुजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड(जिंती):- प्रतिनिधी
दिनांक:- ०७-०७-२५
कराड दक्षिणचे दमदार लोकप्रिय आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वतीने येळगाव जिल्हा परिषद मतदार संघ मध्ये, मनव, खुडेवाडी, साळशिरंबे, महारुगडेवाडी, जिंती या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधिल गोरगरीब, होतकरू व सर्वच विद्यार्थ्यांना वही, पेन्शील, शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दरवर्षी डॉ. अतुल बाबा भोसले शिक्षणाचा दर्जा उंचावा यासाठी गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात. यामुळे मुलांना शिक्षणासाठी ग्रामीण भागात हातभार लागल्याची चर्चा सर्व ठिकाणी होत आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक जिल्हा परिषद जळगाव मतदारसंघातून होत आहे.
यावेळी, भाजपा कराड दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष मा.प्रविण साळुंखे (दत्ता भाऊ), भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, कुस्ती संघटक पै.तानाजी चवरे, मनव गावचे उपसरपंच मा.दादासो शेवाळे, मनव विकास सेवा सोसायटी चेरमन मा.संताजी शेवाळे, महारुगडेवाडी गावचे सरपंच मा.बाळकृष्ण माने, तंटामुक्ती अध्यक्ष मा.जंहागिर शेख, मा.कृष्णत कंळत्रे, साळशिरंबे गावचे माजी उपसरपंच पै.मा.जयवंतराव यादव, जिंती गावचे माजी उपसरपंच पै.मा.जयवंतराव शेवाळे, जिंती गावचे पोलीस पाटील मा.संतोष पाटील, मनव गावचे पोलीस पाटील मा.कृष्णत पोळ, पै.मा.बापूराव पोळ, मा.विलास चवरे, मा.सागर विभुते, मा. प्रदिप खुडे (दादा) इत्यादी उपस्थित होते.