पुरोगामी पत्रकार संघाच्या तीन पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक ०३/०७/२०२५
बुधवार दिनांक ०२/०७/२०२५ रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार व रायगड जिल्हा संघटक उमाजी मंडले यांचा वाढदिवस पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. तसेच अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर यांचा वाढदिवस पेन येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पेन येथे आयोजित कार्यक्रमात अश्विनी ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अन्याय अत्याचार निवारण समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा दिपा अग्रवाल, पुरोगामी पत्रकार संघाचे उरण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण नाईक आणि उरण तालुका संघटक अलंकार कडू उपस्थित होते.
पनवेल येथील कार्यक्रमात राजपाल शेगोकार व उमाजी मंडले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, अन्याय अत्याचार निवारण समितीच्या राज्य कार्याध्यक्षा प्रमिला आढांगळे, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रितमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा सहसचिव महेंद्र माघाडे, जिल्हा संपर्कप्रमुख दत्तू ठोके, जिल्हा संपर्कप्रमुख गणेश पराड, अन्याय अत्याचार निवारण समितीचे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, पश्चिम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष राकेश सुर्वे, पत्रकार संघाचे खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत, कर्जत तालुका अध्यक्ष भालचंद्र गायकवाड, आणि इतर पदाधिकारी तसेच उरण तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील अन्याय अत्याचार निवारण समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष मंगेश खुटले आदि मान्यवर उपस्थित होते.