प्रसिद्ध विकासक व मनराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मनोज भाई नाथानी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर!

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल-उलवे प्रतिनिधी.
दिनांक:- २९-०३-२९२५
रविवार दिनांक 29 जुन 25 रोजी मनराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष व प्रसिद्ध विकासक, मनोजभाई नाथानी यांच्या वाढदिवसा निमित्त कुर्ला पश्चिम येथील मॅचिस फॅक्टरी लेन, मनराज हाईटस या प्रतिष्ठन कार्यालय परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने मोफत आरोग्य शिबीर, मोफत चष्मे वाटप आणि स्नेह भोजन ठेवण्यात आले होते.
आरोग्य शिबिरात शेकडो गरजवंत सहभागी झाले होते.मनोजभाई नाथानी हे त्यांच्या मातोश्री यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माॅं शीला नावाने ओपीडी रुग्णालय चालवित आहेत तसेच मुंबई ठाणे नवी मुंबई ते पालघर डहाणू तालुक्यातील अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करतात,शिबिरे नित्यनेमाने सुरू आहेत अनेक सेवाभावी संस्था त्यांच्या सोबत जोडलेल्या आहेत त्या पैकी लोक विकास परिवार आहे. गोरगरीब,दिव्यांग यांचा आधारस्तंभ,.संत वृत्तीचे मनोजभाई नाथानी यांच्या पवित्र सेवा भावी कार्याला सलाम व शुभेच्छा देण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघ,रायगड.चे कामोठे शहरातील नवनिर्वाचित प्रतिनिधी. अर्जुन गवळी. उपस्थित होते.
आपण शतायुषी व्हा……!
हि मनोजभाई नाथानी यांस
दैनिक झुंजार टाईम्स,शिवधर्म वृत्तपत्र व पुरोगामी पत्रकार संघ. रायगड. कडुन ईश्वर चरणी प्रार्थना.व उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐