ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २२-०६-२०२५
जिंती तालुका कराड जिल्हा सातारा, येथे ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती तालुका कराड जिल्हा सातारा या विद्यालयात शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी साडेसात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग चित्रांचे व माहितीचे पोस्टर प्रदर्शन व योग प्रशिक्षक शिक्षक गणेश तपासे सर व उपशिक्षिका वनिता कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग व प्राणायाम आणि ध्यान धारणा करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना योगाचे महत्त्व व विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी नियमित योग व प्राणायाम करून आपल्यावरील विद्यार्थ्यांनी आपल्यावर असणारा अभ्यासाचा व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचा ताण कमी करून निरोगी व निरामय जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले. आयुष्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमात विद्यालय सहभागी होत असून आरोग्यविषयक जनजागृती करण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
योग करण्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते त्यांनी योग दिन कार्यक्रमात शारीरिक योग, प्रार्थना, प्राणायाम व विविध प्रकारची आसणे करून विद्यार्थ्यांनी योगाचा व मन एकाग्र करून ध्यानधारणेने शांततेचा आनंद घेतला.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संभाजी खोचरे यांच्या हस्ते योगचित्र व माहितीच्या पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले, तर योग दिन साजरा करण्यासाठी उपशिक्षिका रुपाली माळी लिपिक गणेश साळुंखे व कर्मचारी संदीप मोहिते यांनी योगात सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.