खेळ
पैलवान तानाजी चवरे (आप्पा) यांना यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे पुरस्कार जाहीर!

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २२-०६-२०२५
कराड तालुक्यातील कुस्ती संघटक पैलवान तानाजी चवरे (आप्पा) यांनी कुस्ती क्षेत्रातील २५ वर्षे भरीव कामगिरी केली. तालुक्यातील कुस्ती क्षेत्रातील आयडॉल म्हणून आप्पा विशेष ओळख आहे. वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात उत्तम प्रकारचे कुस्ती मैदान साळशिरंबे येथे घेतले जाते.या कामाची दखल यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने २०२४ २५ यशवंतराव चव्हाण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी घनसोली येथे दुपारी ३.०० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कराड तालुक्यात आप्पांना मिळणार मिळाल्यामुळे कुस्ती क्षेत्रातील पैलवान, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.