वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- राजपाल शेगोकार
दिनांक:- १९-०६-२०२५
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांचा वाढदिवस बुधवार मोठ्या उत्साहात पार पडला. रवी नाईक यांनी माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन रवी नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक हे आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय लाडके नेते आहेत.दरवर्षी रवी नाईक यांचा वाढदिवस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात व थाटामाटा साजरा करण्यात येतो यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेचे आजी-माजी सर्व नगरसेवक व नगरसेविका जिल्हा परिषद चे आजी-माजी सर्व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदे मातरम् इको टॅक्सी संघटनेचे सर्व पदाधिकारी वंदे मातरम रिक्षा चालक-मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी व नाकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, तसेच भाजपचे सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक अजय बहिरा, कोप्रोली चे माजी सरपंच रमेश पाटील, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव रवींद्र कोरडे, उपेंद्र मराठे, मधुकर उरणकर, अंकुश पाटील, निलेश, जगदीश पाटील, किशोर सुर्वे, दीपक नावडेकर, नरेश पाटील, राजपाल शेगोकार, जितेंद्र म्हात्रे, कांचन पालकर, अभिलाष डांगरकर ,धनराज पाटील, बाळू भालेकर दीपक रोड पालकर, दीपक सोनताटे, साईनाथ पाटील, दीपक पाटोळे, हनुमान गायकवाड, प्रवीण ठाकूर, अण्णा शेट्टी, जालिंदर वाघ, संजय मोरे, रोहिदास मढवी, अंबादास सुराशे, शत्रुघ्न जगताप, सतीश चेके, सुमित धरम, व इतर सभासद उपस्थित राहुन रवी नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले.