वंदे मातरम् कामगार संघटनेचे पनवेल आर टी ओ सोबत रिक्षा चालकांच्या समस्या बाबत चर्चा!

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १२-०६-२०२५
वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पनवेलच्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत रिक्षा चालकांच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यासाठी सदिच्छा भेट घेण्यात आली.
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांनी मंगळवारी पनवेलचे आरटीओ अधिकाऱ्यांसोबत या बैठकीत रिक्षा रिकॅलिब्रेशन रिक्षा मॅटर मधील सॉफ्टवेअर मुळे असलेल्या अडचणी यावर विशेष चर्चा झाली, अनेक रिक्षा चालकांना नवीन मीटर खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे निदर्शनास आले. रिक्षा रिकॅलिब्रेशन साठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्या बाबत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, तसेच कागदपत्राच्या दरम्यान होणाऱ्या पैशाच्या मागणीबाबत संघटनेने आवाज उठवला. या संदर्भात कारवाई करण्याची मागणी करत त्याचेही निवेदन देण्यात आले. नवीन जीपीएस प्रणाली संबंधी माहितीची देवाणघेवाणही यावेळी झाली. पनवेल आरटीओ चे वरिष्ठ अधिकारी चव्हाण यांनी स्वतः तुमचे कुठलेही प्रॉब्लेम अडचणी असल्यास माझ्याकडे पत्र व्यवहार करा मी त्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन न्याय देण्याच काम नक्कीच करेल असं सुद्धा चव्हाण यांनी आश्वासन दिले आहे.
या बैठकीस वंदे मातरम् संघटनेचे सचिव रवींद्र कोरडे, वंदे मातरम् रिक्षा चालक-मालक संघटनेचे नाका अध्यक्ष व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, उपाध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, अंकुश पाटील, दीपक नावडेकर, दीपक मात्रे, संतोष म्हात्रे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते संघटनेने दिलेल्या पत्राची आरटीओ कडून नक्कीच दखल घेऊन आपल्याला न्याय मिळवून देतील अशी संघटनेकडून अपेक्षा केली आहे.