आर.पी.आय.(आ.) गटाच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी अविनाश दुधावडे यांची निवड!

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पुणे प्रतिनिधी
मंगळवार दिनांक १० जुन २०२५
राजगुरुनगर (खेड.) रिपब्लिकन पार्टी ऑफ ईंडीया(आठवले.) हा भारतातील एक महत्वाचा बहुजन पक्ष असुन त्याचे रामदास आठवले हे नेते आहेत. हा पक्ष NDA शी सल्गन असुन रामदास आठवले हे २०१६ पासुन राज्य घटनेच्या उच्च सभागृहाचे सभासद व समाज कल्याण राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) गटाच्या पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी अविनाश दुधावडे यांची निवड करण्यात आली असुन त्याची अधिकृत घोषणा पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या तर्कफे रण्यात आली आहे.
यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अविनाश दुधावडे हे पुर्वी राजगुरुनगर (खेड)तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते आपल्या परिसरातील सामान्य जनतेशी जवळचे असुन शिक्षण आरक्षण आणि शेतकरी विषयक योजनांसाठी काम करत आले आहेत. त्यांनी सामाजिक पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात महत्वाची भुमिका बजावली असुन आरक्षण कृषी व सामाजिक न्यायासंबधी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांचा हा सातत्यपूर्ण सेवाभाव लक्षात घेता पक्षाने त्यांची संपर्कप्रमुख पदी निवड केली आहे.
अविनाश दुधावडे यांच्या कार्याचा गौरव म्हणून संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ज्ञनिवडीनंतर पक्षकार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी त्यांचे स्वागत व हार्दिक अभिनंदन केले आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवीन उर्जा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.