राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ( संचलीत) अन्याय अत्याचार निवारण समितीचे मालेगाव मध्ये जोरदार एन्ट्री!

झुंजार टाईम्स
प्रतिनिधी: मालेगाव
दिनांक:- ०८-०६-२०२५
मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात बैठक मोठ्या उत्साहात पार पडली बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी भूषवले.
या बैठकीला प्रमुख उपस्थिती गिरणा मौसम चे संपादक ज्येष्ठ पत्रकार कैलास माळी यांची उपस्थिती लाभली कैलास माळी बोलताना म्हणाले की मी गेले ४० ते ५० वर्षे पत्रकारिता करतो परंतु पुरोगामी पत्रकार संघासारखा पत्रकार संघ अद्याप बघितला नाही संघ हा प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने झटत असतो हे मी गेले कित्येक वर्षे पाहत आहे. आणि मी तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांना आव्हान करतो की आपण इतर पत्रकार संघटना सोडून एकदा पुरोगामी पत्रकार संघात सामील व्हा आणि पहा, आपल्यातला बदल असे आज या बैठकीत आव्हान करतो, त्याचबरोबर संघाचे राष्ट्रीय संघटक ज्ञानेश्वर बागुल यांनी संघाचे नियम काटेकोरपणे पालन केले पाहिजे संघ नेहमी तुमच्या पाठीशी अशी भावना व्यक्त केली तसेच संघाचे संघटक शेखर सोनवणे यांनी देखील संघाबद्दल अनेक विषयांवर चर्चा केली या बैठकीत प्रामुख्याने
अन्याय अत्याचार निवारण समितीचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी सीआरपीएफ सेवानिवृत्ती सैनिक किशोर कापडणीस यांना जबाबदारी देण्यात आली याबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले
मिटीग मध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते आजच्या मिटीग चे सुत्र संचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल यांनी केले आज अन्याय अत्याचार समिती च्या नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष पदी दाभाडी येथील किशोर कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली तर वृक्षभ देसले नाशिक जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली महेश भाणूदास जाधव मालेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर गणेश देवरे यांची मालेगाव तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली प्रदीप शिंदे यांची मालेगाव तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर मालेगाव तालुका सचिव दिनेश केदारे तर चेतन गायकवाड यांची मालेगाव तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आजच्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी तर राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल राज्य सह संघटक शेखर सोनवणे राज्य सल्लागार मोसम गिरणा चे संपादक कैलास माळी हे स्वता: उपस्थित होते पुरोगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप देवरे व संजय सुर्यवंशी मालेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख व राजेंद्र जगताप शांतीयुग चे संपादक मालेगाव तालुका उपाध्यक्ष हे उपस्थित होते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.