शेती विषयक
भाजीपाल्यांचे दर १०० च्या वर.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०७-०६-२०२५
अवकाळी व वादळी पावसामुळे महाराष्ट्रात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस पडल्याने पूरस्थिती सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अक्षरशा पावसामुळे टोमॅटो, वांगी , भेंडी इत्यादी भाजीपाला माती मोल झाला आहे. तर काही ठिकाणी कांदे पावसाने भिजून अतोनात नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात पावसाने भाजपल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे बहुतांश भाज्यांच्या दरात शंभरी गाठली आहे. चांगल्या प्रतीच्या मानाचे प्रमाण कमी झाले तसेच थांबले आहे त्यामुळे आवक घटली आहे.