अपघात
मोबाईल दुकानाला भीषण आग, मोठे नुकसान.

दैनिक झुंजार टाईम्स.
महेंद्र माघाडे. उलवे:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०५-०६-२०२५
आज सकाळी पनवेल.शहरातील मुख्य बाजारपेठेतील,लाईन अळी.येथील सकाळी,बंद असलेल्या टुडे नावाच्या, एका मोबाईल दुकानाला भीषण आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीत दुकानातील लाखोंच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आसपासचे दुकानदारही घाबरलेल्या अवस्थेत आहेत.