खेळ
१८ वर्षानंतर आरसीबीने जिंकली आयपीएल ट्रॉफी!
आयपीएलच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात शेवटी आरसीबीची बाजी.

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०४-०६-२०२५
१८ वर्षाच्या वनवासानंतर अखेर आरसीबीचे स्वप्न साकार; अहमदाबादच्या मैदानावर आज झालेल्या थरारक आयपीएल अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्सवर मात करत आपली पहिलीवहिली ट्रॉफी पटकावली आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९१ धावांचा डोंगर उभा केला, पण पंजाब किंग्सला हे लक्ष्य गाठता आले नाही. कर्णधार विराट कोहलीने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले, ४३ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेर, कोहलीचे आयपीएल जेतेपदाचे स्वप्न साकार झाले !