सामाजिक
धानसर, टेंभोडे व वळवली गावं हाय मास्ट स्ट्रीट लाईट ने उजळले.

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी.
दिनांक:- ०३-०६-२०२५
पनवेल महानगर पालिका हद्दीतील धानसर, टेंभोडे व वळवली गावं बौद्ध वस्ती, स्मशान भुमी, व समाजमंदीर जवळील रस्ते. यांना २ जुन ला हाय मास्ट स्ट्रीट लाईट लावुन पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे. यांनी गावं उजाळली आहेत.
भिमशक्ति संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुभाषदादा गायकवाड, पनवेल अध्यक्ष पंकज गायकवाड व तलोजा अध्यक्ष सुरेंद्र जाधव यांनी पनवेल महानगर पालिकेला केलेल्या मागणीची त्वरीत दखल घेतल्याबद्दल, पनवेल महानगर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांचे सुभाषदादा गायकवाड यांनी व गावक-यांनी आभार मानले.
विशेष म्हणजे सुभाषदादा गायकवाड यांचा २ जुन ला वाढदिवस असल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे.
सुभाषदादा गायकवाड हे. निस्वार्थी पणे कुठलेही कामं करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळेच त्यांच्या कामाचे चोहोबाजूंनी कौतुक होत आहे.