हवामान
पर्यटकांनो, धोकादायक ठिकाणी जाणे टाळा.

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०३-०६-२०२५
सध्या महाराष्ट्रात सगळीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यातच लोणावळा व मावळ परिसरातील धरणे, नद्या, धबधबे, गडकिल्ले आणि डोंगर-दऱ्या पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, धोकादायक ठिकाणी जाणे जीवावर बेतू शकते. दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याजवळील बलवान धरणात १७ वर्षीय युवकाचा, तर दुसऱ्या दिवशी चाकणजवळ चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीची माहिती नसणे आणि बेजबाबदार पर्यटन यामुळे असे अपघात घडतात. प्रशासनाने धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.