श्रद्धांजली
कालकथित हिरामण गंगाराम रोकडे यांचा प्रथम पूण्यानुमोदन…..!

झुंजार टाईम्स
धनाजी पुदाले:- नवी मुंबई प्रतिनिधी
दिनांक ०२-०६-२०२५
रविवार दिनांक ०१ जून२५ रोजी कालकथित हिरामण रोकडे यांचा पूण्यानुमोदनाचा कार्यक्रम एस.व्ही स्कूल, सेक्टर-२, नेरूळ,नवीमुंबई सकाळी, ११:३० वाजता साजरा करण्यात आला.
हिरामण रोकडे हे अकस्मित रित्या एक वर्षापूर्वी डि वाय पाटील रूग्नालय, नेरूळ येथे मृत्यू पावले. मृत्यु समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. ते अतिशय मित्तभाषी, शांत स्वभावाचे, नेवल डाॅक मध्ये वायरमन सूपरवायझर म्हणून ३३ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा व सुन असा परिवार आहे.
दैनिक झुंजार टाईम्सचे पत्रकार महेंद्र माघाडे हे त्यांचे मोठे जावई होय. प्रथम पूण्यानुमोदन कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यास नातेवाईकांसोबतच भाजप चे नवनिर्वाचित नवीमुंबई तालुका अध्यक्ष डाॅ.राजेश पाटील (नाना.) हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.