मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ३१-०५-२०२५
मे महिन्याच्या सुट्ट्या संपत आल्या आणि गावाकडून परत येणारे प्रवासी परतू लागले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने थैमान घालून पाऊस लवकर चालू होणार याचे संकेत दिले आहेत.
यावर्षी स्कूल कॉलेज लवकरच चालू होणार आहेत त्यामुळे नोकरी व व्यवसाय करणारे मंडळी आता शहराकडे प्रस्थान करत आहेत.
मुंबईकडे येणारे व पुण्याकडे जाणारे वाहतूक खंडाळा घाटामध्ये वाहनांच्या आज लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी वाहने बंद पडले आहेत तर काही ठिकाणी घाटामध्ये प्रवाशांनी वाहन गरम होत असल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी केली आहेत. किमान तीन ते चार किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा आज सकाळी एक वाजल्यापासून दिसून येत आहेत. त्यामुळे खंडाळा घाटात प्रवासी अडकून पडले आहेत. या वाहनांची सुटका करण्यासाठी वाहतूक हवालदार प्रयत्न करत आहेत. या कालावधीत घाटामध्ये पावसाची आज उघडी आहे पण उकाडा जाणवत आहे. लवकरच वाहतूक पोलीस या वाहन कोंडीतून प्रवाशांना सोडवतील ही अपेक्षा प्रवासी करत आहेत.