महाराष्ट्र ग्रामीण
भिमशक्तीच्या माध्यमातून घोट गावच्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा.

छाया:- प्रतिकात्मक
झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- कळंबोली प्रतिनिधी
दिनांक- २७-०५-२०२६
भिमशक्ति संघटनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचे मुख्य अभियंता मा. संजय कटेकर ह्यांची भेट घेऊन घोट गावातील उड्डाण पूल व गावातील रस्ता ह्या दोन्ही मार्गाने जाणे अतिशय कठीण होत आहे. ही दोन्ही महत्वाची कामे अती तात्काळ चालू करण्यात यावी ह्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भिमशक्ती संघटनेचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुभाषजी गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्या सोबत कटेकर पनवेल महानगर पालिका. मुख्य अभियंता यांची भेट घेतली व निवेदन, दिले. कटेकर यांनी सांगितले की, येत्या ७ ते ८ दिवसात दोन्ही कामे जेवढ्या लवकर पूर्ण होतील तेवढ्या लवकर पुर्ण करण्याचं आम्ही प्रयत्न करतोय. सदरील चर्चेमध्ये, घोट गावचे पोलिस पाटील मा. प्रदीप जाधव उपस्थित होते.