पोलीस अंमलदाराच्या सतर्कतेमुळे नवजात बालकाला जीवदान.
पार्क साईट पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सतीश ससाणेंच्या कामगिरचं सर्वच स्तरातून कौतुक.

झुंजार टाईम्स
अनिकेत सुर्यवंशी:- मुंबई प्रतिनिधी
दिनांक:- २७-०५-२०२५
मुंबई – भांडुप टेकडी येथील हनुमान नगर या ठिकाणी अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या २८ वर्षीय युवकावर पार्क साईट पोलीस ठाण्याचे अंमलदार सतीश ससाणे यांची नजर पडताच व सदर युवकाचे हावभाव याच्यावर संशय आल्यामुळे पोलीस अंमलदार सतीश ससाणे हे कर्तव्यावर असलेल्या गांधीनगर पेट्रोल पंपावर त्यांनी सदर युवकाची चौकशी केली असता सदर युवक हा नवजात बालिकेला घेऊन चालला असल्याचे त्यांना समजले ससाणे यांनी तात्काळ याबाबत चौकशी केली असता हे नवजात बालक अनैतिक संबंधातून जन्माला आले असल्याचे व हा युवक ह्या नवजात बालकाची विल्हेवाट लावण्यासाठी जात असल्याचे समजले.
ससाणे यांनी तात्काळ ही बाब पार्क साईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर तथा (गुन्हे शाखेचे) पोलीस निरीक्षक सानप यांना सांगत या नवजात बालकाला जीवदान दिले.
नवजात बालक व मता हे सध्या राजावाडी रुग्णालयात दाखल असून आरोपी दशरथ शिवशरण हा पोलीस कोठडीत आहे.
ह्या संपुर्ण घटनेवर लक्ष ठेवून कर्तव्दक्ष पणे कारवाई करून नवजात बालकाचा जीव वाचवणाऱ्या पोलीस अंमलदार सतीश ससाणे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.