आपत्कालीन व्यवस्थापन
पनवेल महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन!

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक :- २६-०५-२०२५
रात्रीपासून पडणाऱ्या संतत पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले असून आज सकाळपासून सर्व विभागप्रमुख व विभाग अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात मदत कार्यासाठी कार्यरत झाले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोणताही प्रकारच्या मदतीसाठी
1. पनवेल कनेक्ट कॉल सेंटर क्रमांक 8960916091 या क्रमांकावर
2. पनवेल महानगरपालिकेच्या
New Panvel Fire Station 02269365670
Kalamboli Fire Station 02269365802
Old Panvel Fire Station 02227461500
यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे