
झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- कळंबोली प्रतिनिधी
सोमवार, दिनांक २६.मे २०२५
महाराष्ट्रत सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, नवीमुंबई तसेच संपुर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तीन ते चार दिवस मुंबई, नवीमुंबई, रायगड,पुणे आदी ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
सोमवारी पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत, कळंबोली, कामोठे, पनवेल येथे मुसळधार पावसामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाले आहे. कळंबोली मध्ये काही ठिकाणी अर्ध्या गाड्या बुडाल्या आहेत, सोसायट्यांमध्ये, ,घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यावर दोन -तिन फुट पाणी जमा झालेले असल्यामुळे वाहन चालक व सर्व सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. महानगर पालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आपत्ती व्यावस्थापन काय करत होते व नाले सफाई बाबत प्रश्न उपस्थित होत आहे? पहिलयाच पावसात संपुर्ण परिस्थीती आवाक्या बाहेर गेल्याची दिसत आहे.