आर्थिक घडामोडी
अटल सेतू लवकरच टोल फ्री होणार सरकारने काढला आदेश.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २६-०५-२०२५
गेल्या वर्षभरापासून अटल सेतू चालू झाला. यामधून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना वाहतुकीतून दिलासा भेटला आहे. त्याचबरोबर वेळेची व इंधनाची बचत झाली पण वाहनांना महाराष्ट्रातील टोल नाक्याच्या मानाने यावर जास्त टोल आहे. तरी सुद्धा जास्तीत जास्त वाहने इथून प्रवास करीत आहेत.
महाराष्ट्र सरकारने आता इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतू मार्गावरील टोल माफी पुढील पाच वर्षासाठी देण्यात आली आहे. अशी माहिती पीडब्ल्यूडी ने दिली आहे. टोल माफी करण्याचे आश्वासन जीआर मध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीतून दिलासा मिळणार आहे.