महाराष्ट्र ग्रामीण
राज्यात कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ.

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २४-०५-२०२५
मागील दोन वर्षांपूर्वी संपुर्ण जगाला हादरवणारा करोना परत सक्रिय झाला आहे. मराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी २२ मुंबईत, ५ पुण्यात आणि २ पिंपरी-चिंचवडमधून आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १४५ झाली आहे. आरोग्य तज्ञांनी घाबरू नये, परंतु मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा सल्ला दिला. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी सांगितले की, लसीकरण आणि सामूहिक प्रतिकारशक्तीमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.