लग्न करून बॉर्डरवर गेला, आणि शहीद झाला, महाराष्ट्राच्या पुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण!
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांच्या एन्काऊंटरमध्ये महाराष्ट्राचा जवान शहीद झाला आहे. संदीप गायकर असं या जवानाचं नाव आहे.

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २२-०५-२०२५
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांच्या एन्काऊंटरमध्ये महाराष्ट्राचा जवान शहीद झाला आहे. संदीप गायकर असं या जवानाचं नाव आहे. संदीप गायकर हे ब्राह्मणवाडा ता. अकोले जि. अहिल्यानगर गावचे शुर सुपुत्र.
१२ वर्ष ४ महिने आणि २५ दिवसांपूर्वी संदीप गायकर लष्करामध्ये भरती झाला होता, तसंच ९ महिन्यांपूर्वी संदीप मराठा आरआर बटालियनमध्ये सामील झाला होता. काही महिन्यांपूर्वीच संदीपचं लग्न झालं होतं. किश्तवाडमधील चकमक अजून सुरू असून लष्कर आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरूवारी सकाळी ‘ऑपरेशन त्राशी’ सुरू झालं, यामध्ये लष्कर आणि पोलिसांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. हे एन्काऊंटर किश्तवाडच्या सिंघपोरा छत्रू भागात सुरू आहे, जिकडे लष्कराने दहशतवाद्यांच्या एका ग्रुपला घेरलं आहे
लष्कराने आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे तर इतर दोन ते तीन दहशतवादी अजूनही याच भागात आहेत, त्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू आहे. याआधी मागच्याच आठवड्यात लष्कराने पुलवाच्या त्राल भागात जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. आसिफ अहमद शेख, आमीर नजीर वानी आणि यावर अहमद भट अशी या तीन दहशतवाद्यांची नावं होतं. याआधी शोपियांमधल्या जीनपथेर केलर भागातही लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते, यातल्या दोघांची नावं शाहिद कुट्टे आणि अदनान शफी अशी होती.
पण यामध्ये आपला हुकमी एक्का गमावला.