महाराष्ट्र ग्रामीण
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरूच.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २२-०५-२०२५
गेली दोन दिवस सतत अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे पनवेल परिसरामध्ये काही ठिकाणी पाणी साठले तर काही ठिकाणी झाडेही पडली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालविताना त्रास होत आहे.
पनवेल परिसरामध्ये अवकाळी पाऊस अजून तीन ते चार दिवस पडणार असे हवामान खात्याने सांगितले आहे. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात संध्याकाळी विजेचा लपंडाव चालूच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कधी रात्रीच्या अकरा वाजता विजेचा लपंडाव ए जा करते तर कधी रात्रीच्या दोन वाजता लपंडाव चालूच राहतो. अजूनही उष्माघात कमी झाला नसल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विजेचा लपंडाव कशामुळे चालू आहे हे अद्यापही नागरिकांना समजत नाही.