धोंडेवाडीच्या तातोबा पवार यांना आरोग्य सेवेच्या कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित!

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २०-०५-२०२५
धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील तातोबा पवार अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेतला त्यांचे वडील कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी वॉर्ड बॉय म्हणून काम करतात.कराड तालुक्यातील गरजू लोकांना मदत मदत करणारे तातोबा पवार यांना सामाजिक कार्याची आवड असणारे हाच वारसा पुढे चालवण्याचे काम त्यांनी केले.
परिस्थिती बिकट असतानाही कृष्णा नर्सिंग कॉलेज कराड मधून त्यांनी पी बी एस सी नर्सिंग हा शिक्षण पूर्ण करून आरोग्य सेवेचा वसा हाती घेतला. हॉस्पिटल मध्ये काम करताना गरीब, दिन दुबळ्या लोकांना त्यांनी आपल्या कार्यातून मदत केली कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी २४ तास अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आपले कर्तव्य पार पाडले.याच काळात कोविड रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, मास्क आणि सॅनिटायझर वाटप ,इंजेक्शन उपलब्ध करणे ,ॲम्बुलन्स आणि रक्ताच्या तपासण्या अल्प दरात करणे, मेडिसिन किट वाटप करणे ,मानसिक आधार देणे या सर्व कार्यातून त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली. रुग्णांसाठी दिवस-रात्र वेळ न बघता सातत्य ठेवून मदत केली आहे. या कार्यामुळे सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे आरोग्य सेवक दूत म्हणून ओळखले जाऊ लागले.
हजारो रुग्णांना बरे करणारे तातोबा पवार यांना देशभक्त रत्नापा कुंभार सर्वत्कृष्ट कोरोना योद्धा पुरस्कार, वीर खशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार ,कराड तालुका समाज भूषण पुरस्कार, हिंदकेसरी फाउंडेशन योद्धा पुरस्कार ,महाराष्ट्र माझा न्युज चैनल आरोग्य भूषण पुरस्कार ,कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्र राज्य आदर्श योद्धा ,कोल्हापूर पत्रकार संघटना ,कोरोना युद्ध पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
आरोग्य सेवेच्या देवदूताने गेली पंधरा ते सोळा वर्ष अखंड रुग्णांसाठी मदत केली. कर्म तसे फळ यानुसार तातोबा पवार यांना या कामाची पोच पावती म्हणून १४ मे २०२५ रोजी पुणे येथे झालेल्या “स्वर्गीय दादासाहेब फाळके इंटरनॅशनल बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड इयर” चा मानकरी होऊन त्यांनी कराड तालुक्यात मानाचा तुरा रोउन अभिमानास्पद काम केले आहे. हा पुरस्कार त्यांनी त्यांचे वडील यांना समर्पित करून “पुत्र व्हावा तो ऐसा” नात्यातील आदर्श घडवण्याचे काम केले. या कार्याचा गौरव कराड दक्षिणचे विद्यमान आमदार व भाजप सातारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते कराड येथील शासकीय विश्रामगृहात सन्मान करण्यात आला.या पुरस्काराचे व सामाजिक कार्याचे कौतुक कराड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पैलवान ग्रुप, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, राजकीय मंडळी यांच्याकडून तातोबा पवार यांचे कौतुक होत आहे.