राजकारण

छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार!

झुंजार टाईम्स 

राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी

दिनांक:- २०-०५-२०२५

नाराजी नाट्यानंतर मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ उद्या सकाळी १० वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले भुजबळ अखेर मंत्रिमंडळात सहभागी होत असून, ओबीसी समाजाच्या नाराजीचा हा मोठा परिणाम मानला जात आहे. त्यांच्या हाती अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात येण्याची शक्यता असून, ते यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button