माहिती तंत्रज्ञान

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेडमध्ये उत्साहात संपन्न;

दैनिक 'वीर शिरोमणी' व साप्ताहिक 'नंदगिरीचा कानोसा'चा वर्धापन दिनही साजरा!

झुंजार टाईम्स 

राजपाल शेगोकार:- नांदेड प्रतिनिधी 

नांदेड, १८ मे २०२५

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन व दैनिक ‘वीर शिरोमणी’ व साप्ताहिक ‘नंदगिरीचा कानोसा’ या वृत्तपत्रांचा वर्धापन दिन शनिवार, १८ मे रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अधिवेशनाची गरिमा वाढवली.

अधिवेशनाचे उद्घाटन पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी उपस्थिती लावली.

या अधिवेशनात पत्रकारांच्या समस्या, माध्यम क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचे प्रश्न यावर सखोल चर्चा झाली.

संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितले की, “पुरोगामी पत्रकार संघ हा केवळ संघटनाच नव्हे, तर एका विचारसरणीचा, एका लढ्याचा झेंडा आहे. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता हा विचार संपूर्ण देशभर पोहोचला पाहिजे. माझ्या पत्रकार बांधवांच्या न्याय व हक्कांसाठी मी सदैव शासन दरबारी आवाज उठवत राहीन.”

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर, मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोती शिकारे व नांदेड कार्यकारी मंडळ यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडले.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे, राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड व विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, शेखर सोनवणे, राज्य सचिव दत्ता मुजमुले, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रेखा पाटील, राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अडांगळे (अन्याय अ. नि. समिती), राज्य उपाध्यक्षा दीपा अग्रवाल, राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान, तसेच राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, संघटक उपस्थित होते.

पुणे जिल्हा अध्यक्ष मारुती जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले, ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील, रायगड जिल्हा रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, सहसचिव महेंद्र माघाडे, रायगड, उरण तालुका अध्यक्ष प्रवीण नाईक, तालुका संघटक अलंकार कडू, पेण तालुका अध्यक्ष अश्विनी ठाकूर यांचाही विशेष सहभाग होता.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि आगामी काळात पुरोगामी पत्रकार संघटनेचे कार्य अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याचा निर्धार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button