दुःखद निधन
उमाशशी पोपट कांबळे यांचे दुःखद निधन!

झुंजार टाईम्स
आनंदा धेंडे:- पुणे प्रतिनिधी
दिनांक:- १९-०५-२०२५
दिनांक १८-०५-२५ रोजी सकाळी उमाशशी पोपट कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई व पती असा परिवार आहे. पोपट मारुती कांबळे हे त्यांचे पती आंबेडकर चळवळीतील सक्रिय ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. म्हणून त्यांच्या पत्नी उमाशशी पोपट कांबळे यांच्या अंत्यविधीसाठी पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे हे उपस्थित होते. तसेच कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदास आठवले यांनी उपस्थिती लावून कांबळे कुटुंबीयांचे या दुःखद प्रसंगी सांत्वन केले. उमाशशी कांबळे यांच्या अशा अचानक जाण्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.