माहिती तंत्रज्ञान
अभिनंदन ! इस्रोचे प्रक्षेपण यशस्वी; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

झुंजार टाईम्स
राज्यपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १८-०५-२०२५
इस्तरो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. तीचं कार्य नेहमी एक पाऊल पुढेच असतं आज सकाळी ५:५९ वाजता इस्रोने (ISRO) आपल्या १०१ व्या मोहिमेअंतर्गत PSLV-C61 रॉकेटद्वारे EOS-09 (RISAT-1B) उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हा उपग्रह भारताच्या सीमावर्ती सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि पर्यावरणीय निरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या प्रक्षेपणामुळे भारताच्या अंतराळ संशोधन क्षमतेत आणखी भर पडली असून, देशाच्या संरक्षण आणि विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.