भक्ती श्रध्दा
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ड्रेस कोड लागू.

झुंजार टाईम्स
उमाजी मंडले:- कोल्हापूर प्रतिनिधी
दिनांक:- १६-०५-२०२५
हल्ली फॅशनच्या नावाखाली तरुण तरुणी असभ्य कपडे घालून अंगप्रदर्शन करत आहेत त्यांना आळा घालण्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मी व ज्योतिबा मंदिरांनी १४ मे २०२५ पासून भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश म्हणजे मंदिरांची पवित्रता व सांस्कृतिक मूल्ये जपणे. महिलांसाठी साडी, सलवार-कमीज, पुरुषांसाठी धोती किंवा कुर्ता-पायजमा अनिवार्य करण्यात आले आहे. शॉर्ट्स, स्लीव्हलेस, मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स यासारख्या अपारंपरिक व असभ्य पोशाखातील व्यक्तींना मंदिर प्रवेश नाकारण्यात येईल. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून भक्तीभावाने दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.