महाराष्ट्रात अनेक भागांत अवकाळी पावसाचा जोर!

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १५-०५-२०२५
महाराष्ट्रात सगळीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बीडमधील माजलगाव आणि वडवणी परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. खेड तालुक्यातील कडुस भागात आज वादळी वारे आणि गारांसह मुसळधार पाऊस. शिरूर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका. हिंगोलीत जोरदार पावसाने हजेरी लावली. येवला शहरात वादळी वाऱ्यांसोबत पावसाची दमदार एन्ट्री झाली. कोल्हापुरातही पावसाने दाखल दिली.
प्रवास करणाऱ्या शिक्षकावर विजेचा आघात
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात आज (गुरुवार) दुपारी एका शिक्षकाचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. अवकाळी पाऊस आणि विजांच्या गडगडाटादरम्यान करंजी गावाच्या दिशेने मोटारसायकलवरून निघालेले शिक्षक संजय पांडे यांच्यावर अचानक वीज कोसळली. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परंतु त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.