स्वच्छता
नाले साफसफाई झाली पण घनकचरा व्यवस्थापन कोण करणार?

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १५-०५-२०२५
काही दिवसापूर्वी जुना पुणे हायवेवर ओएनजीसी जवळ रेल्वे पुलाच्या खाली नाल्याची साफसफाई केली होती. साफसफाई करून बाजूला रस्त्याच्या कडेला घनकचरा लावून गेले तीन ते चार दिवस पडून आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालकांना त्रास होत आहे तसेच या घनकचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा हा कचरा त्याच नाल्यात जाण्याची शक्यता आहे. व पुन्हा ही साफसफाई करावी लागणार आहे, त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तरी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने नाले साफसफाई केली, पण हा कचरा अजून उचलला नाही त्यामुळे हा कचरा लवकरात लवकर उचलावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याकडे प्रशासनाने तत्परता दाखवून लक्ष देण्याची गरज आहे.