ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालये आता एसएससी बोर्डाच्या निकालातही अव्वल!

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड(जिंती) प्रतिनिधी
दिनांक:- १५-०५-२०२५
जिंती ता. कराड, जि. सातारा येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे, श्री जोतिर्लिंग विद्यालय जिंती ता.कराड या विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षा मार्च २०२५ चा निकाल शंभर टक्के लागल्याने विद्यार्थी व पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे ग्रामीण भागात गुणवत्तेच्या बाबतीत पालक वर्ग नाखुश असल्याने आपल्या पाल्याला शहरातल्या प्रतीत यश विद्यालयात किंवा भलीमोठी फी भरून अकॅडमीला घालण्याकडे पालकांचा कल दिसून येत आहे, परंतु सध्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहता प्रतीतयश अकॅडमी पेक्षा सरस गुणवत्तेने विद्यार्थी यश प्राप्त करत असल्याचे दिसून येत आहे.
कराडच्या दक्षिणेकडिल डोंगराळ भागात, ग्रामीण क्षेत्रात ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे या संस्थेचे शैक्षणिक कार्य सुरू आहे, उंडाळे, जिंती, गोटेवाडी, तुळसण, येणपे, बामणवाडी, कोणेगाव, कराड यासारख्या ग्रामीण भागात माध्यमिक विद्यालय सुरू करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीचे केंद्र ही संस्था बनली आहे.
संस्थेने चालविलेले जिंती सारख्या एका ग्रामीण भागात श्री जोतिर्लिंग विद्यालय जिंती या नावाने सुरू असलेल्या विद्यालयाचा मार्च २०२५ चा एसएससी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी अव्वल गुणवत्ता ही प्राप्त केली आहे.
१ पाटील प्रतीक्षा मोहन 94.40
२ पाटील साक्षी आनंदा 89.00
३ पाटील वैष्णवी जयकर 87.80
४ बागल वैष्णवी विकास 80.00
५ लोखंडे आर्या अमोल 79.80
या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे.
हे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे अध्यक्ष एडवोकेट मा. आनंदराव पाटील राजाभाऊ, उपाध्यक्ष शंकर अण्णा पाटील (दादा)गुरुजी , सचिव बी आर यादव सर व सर्व संचालक पदाधिकारी ग्रामस्थ, पालक व ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन जिंती चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
श्री जोतिर्लिंग विद्यालय जिंती चे मुख्याध्यापक अशोक कोठावळे, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक संभाजी खोचरे, उपशिक्षिका ,वनिता कुंभार, रूपाली माळी, उपशिक्षक गणेश तपासे, दिनकर आंबवडे, लिपिक विजय धाईगडे, सेवक संदीप मोहिते (दादा) इत्यादी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.