आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने ONGC जवळील रस्त्यालागतची नाले सफ साफसफाईस सुरवात.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १३-०५-२०२५
दरवर्षीप्रमाणे या वर्षी पावसाचे आगमन लवकरच होणार आहे त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ठिकाणी नाले साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे असे दिसून येत आहे.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने जुना पुणे-मुंबई रस्त्यालगत ONGC जवळ नाले साफसफाई काम चालू केले आहे.जवळच्या रेल्वे ब्रीज खाली दरवर्षी पाणी असते. दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी नाले ठेवण्यात आहेत पण ब्रीज खालचा भाग खाली असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साठत असते. पाण्याबरोबर काही प्रमाणात माती येहून बाजूचे नाले भरले जात आहेत.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नाले साफसफाई केली जाते पण पावसाळ्यात ब्रीज खाली पाणी साठले जाते व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यातूनच वाहनांची गर्दी होहून लांबच लांब रांगा लागत असतात. यासाठी कायमस्वरूपी पावसातील पाण्याचा निचरा होण्यासाठी काम करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.