भानामती,करणी,मुठ,विज्ञान कहता सारा झुठ..!
बुद्ध पौर्णिमेनिमित्त नालंदा बुद्ध विहार कामोठे येथे जादूटोणाविरोधी कायदा प्रचार कार्यक्रम संपन्न झाला.

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- कळंबोली प्रतिनिधी
दिनांक:-१३-०५-२०२५
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त नालंदा बुद्ध विहार कामोठे या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन व महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा चमत्कार प्रात्यक्षिकासह व्याख्यान ‘हा कार्यक्रम दि.१२ मे २०२५ रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सल्लागार अर्जुन गवळी यांनी केले. समितीची भूमिका कोषाध्यक्ष अनंता बावस्कर यांनी मांडली. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन व महाराष्ट्र शासनाचा जादूटोणाविरोधी कायदा याबाबत जिल्हा संघटक नरेंद्र जाधव यांनी माहिती दिली.भोंदू बाबा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असे सांगून विविध तथाकथित चमत्कार करून लोकांना फसवत आले आहेत. यातील काही चमत्कारांची प्रात्यक्षिके यावेळी दाखवण्यात आली आणि त्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले. उपस्थितांकडून विचारलेल्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा कामोठे विभागाचे अध्यक्ष,मा. झालटे साहेब यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड शाखा करीत असलेल्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले. शेवटी कविता जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा बावस्कर हिने उत्तम प्रकारे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नालंदा बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र कांबळे व भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.