सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक गौतम भाऊ उबाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा!

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:-राजपाल शेगोकार
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष व सुवर्णभूमी कॉम्प्लेक्स चे अध्यक्ष गौतम भाऊ उबाळे यांचा ५८ वा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. गौतम भाऊ उबाळे वयाच्या 58 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गौतम भाऊ उबाळे सामाजिक व राजकारणात समाजसेवक म्हणून सुकापूर विभागात त्यांची ओळख आहे. भारतीय बौद्ध महासभा स्थापन करणे व वंचित बहुजन आघाडीची मोठी शाखा स्थापन करणे असे हिंमतीने व जिद्दीने त्यांनी केले. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी बौद्धाचार्य अशोक शेगोकार भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा गौतम भाऊ उबाळे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. गौतम भाऊ उबाळे यांच्या पत्नी संगीता उबाळे, मुलगा अक्षय उबाळे, सून आकांक्षा उबाळे, मुलगी प्रज्ञा घोडेस्वार घोडेस्वार परिवार व शेगोकार परिवार व त्यांचे इतर नातेवाईक या सर्वांच्या उपस्थितीत गौतम भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.