
झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक १० मे २०२५
रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीच्या तीन दिवसांतच विराट कोहलीनेही टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याची इच्छा BCCIला कळवली आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, कोहलीने हा निर्णय पक्का केला असून मंडळाने त्याला पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांची महत्त्वाची मालिका तोंडावर असताना BCCI त्याचा अनुभव गमावू इच्छित नाही. अद्याप कोहलीने आपला निर्णय मागे घेतलेला नाही.
वाराटकडे सर्वाधिक एकदिवसीय शतके आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक शतके आहेत . कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे, त्याने सलग दोन कसोटी विजय आणि त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तिन्ही स्वरूपात ९०० रेटिंग गुण मिळवणारा तो एकमेव फलंदाज आहे.