आर्थिक घडामोडी
महागाई ने सामान्य माणसांचे कंबरडे मोडले असताना बेस्ट बस ची दुप्पट भाडेवाढ

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
शुक्रवार ९ मे.पासुन बेस्ट बस ची दुप्पट भाडेवाढ करण्यात आली असुन, आर्थिक तुटवडा भरुन काढण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याचा बेस्ट उपक्रमाने माहिती दिली.
साधी विना एसी बसचे भाडेवाढ पुर्वी ५,कि.मी.साठी ₹=५/ होते ते आता ₹=१०/असणार आहे.
एसी बसचे भाडे आता ५कि.मी.साठी ₹=१२/असेल.
दैनांदिन पासचे भाडे ₹=६०/एवजी ₹=७५/,\ असेल.
मासिक पास ₹=९००/ वरुन ₹=१८००/म्हणजे दुप्पअसेल.तर मुंबई महानगर पालिकेच्या हद्दी बाहेर ₹=2/अधिभार असेल असे बेस्ट उपक्रमा कडुन सांगण्यात आले.
आर्थिक तोटा जास्त वाढल्या मुळे बेस्ट बस च्या भाडेवाढीचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला होता,त्याची अंमलबजावणी ९ मे रोजी करण्यात आली आहे.
नविन बदलानुसार ५ ते १२ वर्षाच्या मुलांची हाफ टिकीट लागणार आहे.
भाडेवाढ खालील प्रमाणे.
विना एसी बस.
सवलत.
५ कि.मी.₹=१०/ ₹=५/
१० कि.मी.₹=१५/ ₹=८/
१५ कि.मी. ₹=२०/ ₹=१०/
२० कि.मी. ₹=३०/ ₹=१५/
२५ कि.मी.₹=३५/ ₹=१५/
३० कि.मी.₹=४०/ ₹=२०/
५० कि.मी.₹=६०/ ₹=३०/
वातानुकूलित एसी बस. सवलत.
५ कि.मी.₹=१२/ ₹=५/
१० कि.मी.₹=२०/ ₹=१०/
१५ कि.मी.₹=३०/ ₹=१५/
२० कि.मी.₹=३५/ ₹=१५/
२५ कि.मी.₹=४०/ ₹=२०/
३० कि.मी.₹=४५/ ₹=२०/
५० कि.मी.₹=६५/ ₹=३०/