पत्रकार अमोल पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
गुरुवार दिनांक. ८ मे २०२५ रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा उपअध्यक्ष व शिवधर्म वृत्तपत्राचे उपसंपादक
अमोल पाटील यांचा वाढदिवस पनवेल येथील शासकीय विश्रामगृहामध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. अमोल पाटील हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांचे वृत्तपत्रातील लेख नेहमीच वाचण्यासारखे असतात. अमोल पाटील हे अतिशय हस-या स्वभावाचे व्यक्तीमत्व आहे. आपल्या पत्रकारिता आणि संचालनाच्या बळावर त्यांनी उपसंपादक ह्या पदापर्यंत फार कमी कालावधी मध्येच गरुड झेप घेतली असुन पुरोगामी पत्रकार संघ, रायगडच्या उपाध्यक्ष पदापर्यत त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक, अध्यक्ष विजय सुर्यवंशी व रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले व रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार यांच्या तर्फे फुलांचा गुच्छ व शाल देउन अमोल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या समयी रायगड जिल्हा सहसचिव महेंद्र माघाडे, रायगड जिल्हा संघटक उमाजी मंडले व पत्रकार प्रमोद म्हात्रे उपस्थित होते.
अमोल पाटील हे वेगाने वाटचाल करणारे व साप्ताहिक शिवधर्म वृत्तपत्रात त्यांचा मोलाचा वाटा आहे, ते सर्वांना प्रेरणा ठरतील असे वक्तव्य विजय सुर्यवंशी यांनी वाढदिवसीय भाषणात केले. तर रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले अशीच उर्जा आपल्या सर्व पत्रकारांनी दाखवावी असे कौतुकास्पद उदगार काढले, तर रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार यांनी अशीच कामगिरी करत रहा म्हणत अमोल पाटील यांची पाठ थोपटून शुभेच्छा दिल्या.