पेंशन मध्ये भरघोस वाढ!

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
मंडळी तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि दरमहा पगारातून PF कट होत असेल, तर ही बातमी तुमच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. सध्या ही रक्कम १००० रुपये आहे, पण आता ती थेट ३००० रुपयांपर्यंत वाढू शकते.
काय आहे ही योजना आणि कोणाला होणार फायदा?
EPS म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना, जी EPFO अंतर्गत चालवली जाते. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही योगदान असते. दरमहा पगारातून तुमच्या EPF खात्यात १२% रक्कम जमा होते. यातील एक भाग EPS योजनेत वळवला जातो आणि याच आधारे तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते.
२०१४ नंतर आता पुन्हा वाढ
होय, २०१४ मध्ये सरकारने EPS अंतर्गत किमान पेन्शन २५० रुपयांवरून १००० रुपये केली होती. त्यानंतर आजपर्यंत कोणतीही वाढ झाली नाही. आता मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की, पुढील काही महिन्यांत किमान पेन्शन ३००० रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.
७५०० रुपयांपर्यंत वाढीचीही मागणी.
अलिकडेच एका संसदीय समितीने EPS अंतर्गत पेन्शन थेट ७५०० रुपये करण्याची शिफारस केली आहे. अनेक कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी यासाठी मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, वाढत्या महागाईच्या काळात १००० रुपयांची पेन्शन पुरेशी नाही.
याचा थेट फायदा कोणाला होणार?
खाजगी नोकरी करणारे EPFO सदस्य EPS अंतर्गत पेन्शनधारक भविष्यात पेन्शन घेणारे कर्मचारी नोकरी करत असताना EPS मधील योगदान आपण फारसे लक्षात घेत नाही, पण निवृत्तीनंतर याच पेन्शनवर आपला मोठा आधार असतो. त्यामुळे ही पेन्शन वाढीची बातमी निश्चितच दिलासादायक आहे. सरकारचा अंतिम निर्णय कधी जाहीर होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.