भक्ती श्रध्दा

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन!

झुंजार टाईम्स 

पनवेल प्रतिनिधी :- राजपाल शेगोकार

दिनांक:-०२ मे २०२५

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम् जनरल कामगार संघटना, स्थानिक रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीन रिक्षा करिता आरटीओ व महानगरपालिका मान्यता प्राप्त रिक्षा नाका हे युनियनचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांच्या प्रयत्नाने उपलब्ध करून दिला आहे. तेथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आले होते.

सत्यनारायणाच्या महापूजेचं कार्यक्रम सकाळी दहा वाजता सर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शविली व दर्शन घेतले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं शाल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कामगार नेते रवींद्र नाईक यांचेही शाल देऊन स्वागत करण्यात आले. रवींद्र नाईक यांनी सुद्धा सर्व पदाधिकाऱ्याचं शाल देऊन सर्वांचे स्वागत केले.
वंदे मातरम् रिक्षा चालक-मालक संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर, जनरल कामगार संघटना अध्यक्ष जितेंद्र घरत, सरचिटणीस मोतीलाल कोळी , उपाध्यक्ष सुरेश पाटील, सहसचिव रवींद्र कोरडे, महानगरपालिका सभापती दर्शना भोईर, आदई गावचे सरपंच रमाकांत गरुडे, नाका अध्यक्ष दीपक पवार, उपाध्यक्ष संतोष पवार, सल्लागार धर्मेंद्र पाटील, खजिनदार मनोज काठमोरे, सहखजिनदार चंद्रकांत ठोंबरे सचिव दत्ता शिंदे, सहसचिव महेंद्र मोरे, कुणाल चौधरी सभासद, राजेश आम्रसकर, महादेव राऊत, दंला खिलारे, अनिल उमापे, तुकाराम चव्हाण, मिलिंद भोईर, किरण माळी, आदित्य उमापे, स्वप्निल दानवे, भाऊ लबडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button