सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश !
उरण येथील कंत्राटी कामगारांना लगेचच कामावर घेतले आहे.

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- कांतीलाल पाटील
उरण : ०१ मे २०२५
उरण म्युनिसिपल एम्पलाॅईज युनियनचे कार्याध्यक्ष, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस आणि कामगार नेते यांनी उरण नगरपालिकेतील कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे या मागणीसाठी प्रशासनाला ०१ मे २०२५ पासून आमरण उपोषणाची नोटीस दिली होती. याआधी संतोष पवार यांच्याच अथक प्रयत्नामुळे राज्यातील हजारो म्युनिसिपल कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी मिळाली आहे. परंतु ते स्वतः कार्यरत असलेल्या नगरपालिकेतील कर्मचार्यांना न्याय मिळाला नाही .यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी रायगड, आयुक्त आणि मंत्रालयीन पातळीवरही पाठपुरावा केला. त्यात यश न आल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या कर्मचारी बंधुंसाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. संतोष पवार यांचा ठाम निर्धार पाहून प्रशासनाने कंत्राटी कामगारांना लगेचच कामावर घेतले आहे.
दि. १५ में २०२५ पर्यंत कायम सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत मंजुरी दिली आहे.
संतोष पवार आणि अनिल जाधव यांनी दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील नगरपालिका कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. ते उपोषणही यशस्वी झाले होते. संतोष पवार यांच्या कार्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !