शिवाजी आण्णा पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतरही सदैव मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे.
सामाजिक बांधिलकी व आपल्या शैक्षणिक कार्यावर प्रेम दाखवणाऱ्या शिवाजी आण्णा पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतरही सदैव मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे. एडवोकेट आनंदराव पाटील राजाभाऊ

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड(जिंती) प्रतिनिधी
जिंती ता. कराड, जि. सातारा येथील श्री निनाईदेवी विद्यालय तुळसण या विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी आण्णा पाटील हे नियत वयोमानानुसार 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत, यानिमित्ताने बोलत असताना ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे अध्यक्ष व सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट आनंदराव पाटील राजाभाऊ यांनी शिवाजी अण्णा पाटील यांच्या शैक्षणिक, व सामाजिक कार्यकर्दीबद्दल उद्गार काढले.
पुढे बोलताना म्हणाले, “शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे या संस्थेच्या माध्यमातून आपणास प्राप्त झाली हे आपले भाग्य आहे. आपल्या हातून अनेक विद्यार्थी घडले अनेकांचे संसार उभा राहिले आणि अनेकांना मान सन्मान प्राप्त झाला यातच आपला मोठा सन्मान आहे. आपण सामाजिक बांधिलकी जपत आपले ज्ञानदानाची कार्य चालू ठेवून अनेक विद्यार्थ्यांवर संस्काराचे पैलू पाडण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. संस्था आपल्या कार्याबद्दल बद्दल आपला आदर आणि आभार व्यक्त करते आहे.”
जिंती ता. कराड येथील जिंती गावचे सुपुत्र व ग्रामीण विकास शिक्षण संस्थेतील श्री निनाई देवी विद्यालय तुळसण या विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिवाजी अण्णा पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन श्री निनाईदेवी विद्यालय तुळसण या विद्यालयाच्या वतीने श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती च्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव माजी प्राचार्य बी. आर. यादव सर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री शंकर अण्णा पाटील गुरुजी, जिंती गावच्या सरपंच सौ निशिगंधा सुशांत पाटील, निरीक्षक व्ही.के. शेवाळे सर, माजी मुख्याध्यापक मा. ए आर पाटील सर जिंती, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संचालक मा. रमेश शेवाळे घोगाव,स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. बी. आर. पाटील सर, पर्यवेक्षक जगन्नाथ माळी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी आण्णा पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल माजी पी. एस आय अशोकराव पाटील, ए. आर पाटील जिंती, निरीक्षक व्ही.के शेवाळे, श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कोठावळे यांनी मनोगते व्यक्त केली.
शिवाजी आण्णा पाटील म्हणाले, ^ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय जयसिंगरावजी पाटील बापू यांच्या आशीर्वादाने शैक्षणिक क्षेत्रात आलो. येणपे सारख्या ग्रामीण भागात काम करत असताना समोर असणाऱ्या मुलांचे भविष्य घडावे, त्यांनी माणूस म्हणून ते घडावे हा विचार मनात घेऊन काम करत गेलो पत्नी सौभाग्यवती भारती पाटील यांनी कुटुंब सांभाळले माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात सहकार्य केले. आज इतकी वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करून जीवन सार्थक झाल्याचे समाधान मला संस्थेने दिलेल्या कामाच्या संधीमुळे आहे याबद्दल मी संस्थेचा, ग्रामस्थांचा, माझ्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा ऋणी आहे असे भावनिक मनोगत व्यक्त केले.
ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या वतीने उभयतांना पोशाख, शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन त्यांचा सर्व ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थ्यां समोर भव्य सत्कार करण्यात आला.श्री निनाईदेवी विद्यालय तुळसण, श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती, तुळसण गावातील श्री रघुनाथ दादा व इतर ग्रामस्थ यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात येत असलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी मध्ये पात्र ठरलेला श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती चा विद्यार्थी चिरंजीव शौर्य विनायक पाटील याचा कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट श्री आनंदराव पाटील राजाभाऊ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी जिंती गावातील ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंती चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . जिंती परिसरातील तरुण वर्ग, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी गणेशोत्सव मंडळ, दुर्गा माता मंडळ यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी गावातील श्री तानाजी पाटील माजी सरपंच जिंती, वसंत केशव पाटील चेअरमन विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायत जिंती उपसरपंच नेहूल अंबवडे, संतोष पाटील पोलीस पाटील जिंती, आकाईवाडी, महारुगडेवाडी, येथील ग्रामस्थ विद्यार्थी पालक सर्व संस्थांचे पदाधिकारी मान्यवर, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निनाईदेवी विद्यालयाचे उपशिक्षक श्री वैभव जाधव सर यांनी केले, तर आभार ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती चे उपशिक्षक श्री संभाजी बापू खोचरे यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निनाईदेवी विद्यालय तुळसण चे उपशिक्षक श्री आनंदराव जानुगडे सर यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री निनाईदेवी विद्यालय तुळसण येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.