हेमंत कडू यांना हिप्नोथेरपीमध्ये डॉक्टररेट पदवी प्रदान.
उरण तालुक्यातील नवघर गावचे सुपुत्र हेमंत कडू यांना हिप्नोथेरपीमध्ये डॉक्टररेट पदवी प्रदान.

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- कांतीलाल पाटील
अयोध्या, २८ एप्रिल २०२५
अयोध्येतील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठात आज झालेल्या विशेष समारंभात हेमंत कडू यांना हिप्नोथेरपी या क्षेत्रात “डॉक्टररेट” म्हणजेच मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या हिप्नोथेरपी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना हा सन्मान दिला आहे.
मानसिक आरोग्य आणि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा यावेळी विद्यापीठ प्रशासनाने केली. यावेळी मुख्य अतिथी पुर्व कुलपति रानी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झांशी पद्मश्री डाॅ.अरविंद कुमार,कुलपति प.दिनदयाल उपाध्याय हिंदी विध्यापीठ अध्यक्षता डाॅ. इन्दु भुषण मिश्रा,सुप्रसिध्द कथा वाचिका वृन्दावन धाम मथुरा मुख्य वक्ता सुश्री दिपा मिश्रा,राष्ट्रीय पर्यावरणविद आणि वर्ड रेकाॅड धारी बागबहरा जिल्हा महासमुंद(छत्तीसगढ) विशिष्ट अतिथि डाॅ.विश्वनाथ पाणिग्रहि या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पदवी प्रधान करण्यात आली.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.